कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF)योजना



नमस्कार आज आपण अशा एका योजनेची माहिती घेणार आहोत ज्यामुळे कृषी व्यवसायाच्या पायाभूत सुविधेसाठी मदत मिळणार आहे.

कृषी पायाभूत सुविधा निधी  योजना (AIF)(Agriculture Infrastructure Fund Scheme )

योजनेची उद्धिष्टे:-

 देशामध्ये जवळ जवळ अंदाजे 500 लाख टन फळे व 700 लाख टन पेक्षा जास्त भाज्यांचे उत्पादन होते या उत्पादनपैकी 40ते 50 टक्के मालाची नासाडी ही अयोग्य हाताळणी, आधुनिक पॅकिंगचा वापर नकरणे, योग्य साठवणुकीचा अभाव या व अन्य कारणांमुळे होते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने कृषी मालाच्या काढणीनंतरच्या प्राथमिक प्रक्रियेसाठी. शेतकरी व त्यांच्या संस्थांना पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी बँक मार्फत कर्ज पुरवठ्या ची योजना आणली आहे.

AIF योजनेचा लाभ काय आहे:-

अ. काढणी पश्चात पायाभूत सुविधा उदा.गोदाम,पैक हाऊस,कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया केंद्र, वाहतुक सुविधा इ . साठी बँके कडून कर्ज मिळेल.2 कोटीपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याजात सवलत मिळेल 7वर्षापर्यंत.

ब. पतहमी निधी संस्थेकडून (CGTMSE)रु. 2 कोटी पर्यंतच्या कर्जावर पत हमी देण्यात येईल.

क. ज्यांना प्रथम कर्ज वितरण 8 जुलै 2020 किंवा त्यानंतर झाले असेल असे प्रकल्प व्याजदर सवलतीस पात्र आहेत.

ड. या प्रकल्पांना इतर योजनेतून ही अनुदान मिळू शकेल. हे अनुदान लाभधारकाचा प्रकल्पातील आर्थिक हिस्सा म्हणून गणला जाइल. मात्र, लाभधारकाला प्रकल्प किमतीच्या किमान 10 टक्के हिस्सा स्वनिधीतून देणे बंधनकारक आहे.

व्याजदर :-1)8.95%(द. सा. द. शे )रु 2 कोटी कर्ज मर्यादेसाठी.
2)9 ते 11%(द. सा. द. शे )रु 2 कोटी पेक्षा जास्त कर्जसाठी.

योजनेचा कालावधी:-2020-21ते2029-30             


योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात:-

1. शेतकरी, कृषी उद्योजक, स्टार्ट-अप्स
2. संस्था- 
विविध कार्यकारी सहकारी संस्था (प्राथमिक कृषी पत संस्था Primary Agricultural Credit Societies) , 
सहकारी पणन संस्था, शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी (FPO/FPC), 
बहूउद्देशीय सहकारी संस्था, 
3. गट- स्वयंसहायता गट, संयुक्त दायीत्व गट

4. केंद्रीय/राज्य यंत्रणा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित केलेले सार्वजनिक-खाजगी भागिदारी प्रकल्प

कोणते प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज मिळेल-

1. काढणी पश्चात व्यवस्थापनाचे प्रकल्प-

i) गोदाम

ii) पॅक हाऊस

iii) प्राथमिक प्रक्रिया केंद्र

iv) संकलन व प्रतवारी केंद्र (grading)

v) रायपनिंग चेंबर्स 

vi) शीत साखळी (cold chains)

vii)लॉजिस्टीक सुविधा (logistics facilities)

viii) मूरघास (silos)

ix) असेयींग यूनिटस (Assaying units)

x) इ-मार्केटिंग प्लेटफॉर्म सह पुरवठा साखळी सेवा (supply chain services including e-marketing platforms)


2. सामुदायिक शेती साठी मालमत्ता निर्मितीचे प्रकल्प-

अ.सेंद्रीय निविष्ठा उत्पादन

ब.जैविक प्रेरके उत्पादन यूनिटस (Bio stimulant production units)

क.स्मार्ट व काटेकोर शेती करिता पायाभूत सुविधा ( infrastructure for smart and precision agriculture)

ड.पिकांचे समूह क्षेत्र तसेच निर्यात क्षेत्रामध्ये पुरवठा साखळी करिता पायाभुत सुविधा विकासाचे निश्चीत केलेले प्रकल्प

इ .केंद्र/राज्य/स्थानिक स्वराज्य संस्था अथवा त्यांच्या अधिनस्त यंत्रणांनी सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून प्रस्तावित केलेले सामुदायिक शेतीसाठी मालमत्ता निर्मिती प्रकल्प किंवा काढणीपश्चात व्यवस्थापनाचे प्रकल्प.

अर्ज कोठे कराल :-www.agriinfra.dac.gov.in







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ह्या योजनेमुळे अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल

आता शेतकरी ही स्थापन करू शकतो कंपनी.