आता शेतकरी ही स्थापन करू शकतो कंपनी.
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला बऱ्याच खासगी क्षेत्रातमधील कंपन्या बघतो उदा. टाटा मोटर, जिओ, पार्ले इत्यादी.पण शेतकऱ्यांनाची कंपनी याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊया शेतकरी उत्पादक कंपनी (FPC)बद्दल. शेतकरी उत्पादक कंपनी/ Farmer Producer Company (FPC) म्हणजे काय? शेतकरी उत्पादक कंपनी अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरीच सभासद होऊ शकतात. आणि शेतकरी सभासदच स्वतः कंपनीचे व्यवस्थापन करतात. शेतकरी उत्पादक कंपनी चा उद्देश :- शेतकरी हा ऊन-पाऊसामध्ये राबून आपला घाम गाळून शेतमाल पिकवतो. पण तयार झालेला माल विकायची वेळ येते त्यावेळी शेतकऱ्याची झोळी फाटलेली असते. आपण पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला नसतो. तसेच शेतामध्ये लागणाऱ्या बी-बियाणे,खते, औषधे यांच्या किंमती ही शेतकऱ्याचा हातात नसतात. तसेच ग्राहकांच्या बाबतीत होते. शेतकऱ्यांना मिळणारा भाव व त्याच वेळी ग्राहकांना मोजावी लागणारी किंमत यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक असतो. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने 2013 साली कंपनी कायद्यामध्ये सुधारणा करून शेतकरी उत्पाद