पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आता शेतकरी ही स्थापन करू शकतो कंपनी.

इमेज
  नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला बऱ्याच खासगी क्षेत्रातमधील कंपन्या बघतो उदा. टाटा मोटर, जिओ, पार्ले इत्यादी.पण शेतकऱ्यांनाची कंपनी याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊया शेतकरी उत्पादक कंपनी (FPC)बद्दल. शेतकरी उत्पादक कंपनी/ Farmer Producer Company (FPC) म्हणजे काय? शेतकरी उत्पादक कंपनी अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरीच सभासद होऊ शकतात. आणि शेतकरी सभासदच स्वतः कंपनीचे व्यवस्थापन करतात. शेतकरी उत्पादक कंपनी चा उद्देश :- शेतकरी हा ऊन-पाऊसामध्ये राबून आपला घाम गाळून शेतमाल पिकवतो. पण तयार झालेला माल विकायची वेळ येते त्यावेळी शेतकऱ्याची झोळी फाटलेली असते. आपण पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला नसतो. तसेच शेतामध्ये लागणाऱ्या बी-बियाणे,खते, औषधे यांच्या किंमती ही शेतकऱ्याचा हातात नसतात. तसेच ग्राहकांच्या बाबतीत होते. शेतकऱ्यांना मिळणारा भाव व त्याच वेळी ग्राहकांना मोजावी लागणारी किंमत यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक असतो.         या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने 2013 साली कंपनी कायद्यामध्ये सुधारणा करून शेतकरी उत्पाद

कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF)योजना

इमेज
नमस्कार आज आपण अशा एका योजनेची माहिती घेणार आहोत ज्यामुळे कृषी व्यवसायाच्या पायाभूत सुविधेसाठी मदत मिळणार आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी  योजना (AIF) ( Agriculture Infrastructure Fund Scheme ) योजनेची उद्धिष्टे:-   देशामध्ये   जवळ जवळ अंदाजे 500 लाख टन फळे व 700 लाख टन पेक्षा जास्त भाज्यांचे उत्पादन होते या उत्पादनपैकी 40ते 50 टक्के मालाची नासाडी ही अयोग्य हाताळणी, आधुनिक पॅकिंगचा वापर नकरणे, योग्य साठवणुकीचा अभाव या व अन्य कारणांमुळे होते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने कृषी मालाच्या काढणीनंतरच्या प्राथमिक प्रक्रियेसाठी. शेतकरी व त्यांच्या संस्थांना पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी बँक मार्फत कर्ज पुरवठ्या ची योजना आणली आहे. AIF योजनेचा लाभ काय आहे:- अ. काढणी पश्चात पायाभूत सुविधा उदा.गोदाम,पैक हाऊस,कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया केंद्र, वाहतुक सुविधा इ . साठी बँके कडून कर्ज मिळेल.2 कोटीपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याजात सवलत मिळेल 7वर्षापर्यंत. ब. पतहमी निधी संस्थेकडून (CGTMSE)रु. 2 कोटी पर्यंतच्या कर्जावर पत हमी देण्यात येईल. क. ज्यांना प्रथम कर्ज वितरण 8 जुलै 2020 किंवा त्यानंतर झाले असेल